Share

सकारात्मक! औरंगाबादेत दहा दिवसात पाच हजार विनाकारण फिरणाऱ्यांची टेस्ट, अवघे ‘पाच’ पॉझिटिव्ह!

Published On: 

औरंगाबाद : शहरात १६ एप्रिलपासून कडक निर्बंधांच्या काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर आवर घालण्यासाठी कोरोना तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मुख्य चौकांमध्ये पथकांची नियुक्ती करण्यात आली. आता कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असलो तरीही गाफील राहून चालणार नाही, यासाठी मनपा आयुक्तांनी १९ मे रोजी ट्विट करत पुन्हा एकदा तपासणी पथकांमध्ये वाढ केल्याचे सांगितले.

२० ते ३० मे या अकरा दिवसांच्या काळात ५३०७ विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. आश्चर्यकारक आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे यात केवळ पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट इतका खाली उतरल्याची चर्चा सुरु आहे.

संचारबंदीचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे पोलीसांद्वारे शहरातील चौकाचौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणी सुरु आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अचानक वाढलेली आढळल्याने मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी तपासणी पथकांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. आधी ३०० च्या आत येणारा आकडा झरझर पुढे सरकला.

२० मे पासून दररोज ५०० च्या पुढे विनाकारण फिरस्ते पोलिसांनी पकडण्यास सुरुवात केली आणि तपासणी पथकांकडून यांची अँटिजेन कोरोना तपासणी करण्यात येऊ लागली. मात्र सध्या शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसात ४९५१ म्हणजे जवळपास पाच हजार जणांच्या तपासणीत केवळ पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. लसीकरण, कडक निर्बंध, नागरीकांची स्वयंशिस्त यामुळे पॉझिटिव्हीटी रेट मध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!