औरंगाबाद : महापालिकेच्या आकृतीबंधास राज्य सरकारने तीन महिन्यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे. मात्र सेवा भरती नियमांना अद्यापही मंजूरी नसल्याने नोकरी भरतीत अडसर निर्माण झालेला होता. आता सेवा भरती नियमांची संचिका नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडून मंत्र्यांकडे मंजूरीसाठी पाठवलेली आहे. लवकरच सेवा भरती नियमांना मंजूरी मिळणार आहे. त्यामुळे नोकर भरतीचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी व्यक्त केला.
मागील काही वर्षांपासून पालिकेच्या आकृतिबंधाचा विषय गेल्या गाजत आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या वादात अडकलेला आकृतिबंध शासनाने दोन वेळा नामंजुर केला होता. अखेर जुनाच आकृतिबंध नव्याने तयार करुन तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्याला अखेर मंजुरी मिळाली. आकृतिबंधाच्या मंजुरीची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात औरंगाबाद दौर्यादरम्यान केली होती. दोन दिवसात याचा जीआर निघेल, असेही ते म्हणाले होते.
त्यानुसार १५ फेब्रुवारी २०२१ रोजी हा शासन निर्णय काढण्यात आला. पालिकेच्या आस्थापनेवर शासन मंजूर ३६ कार्यरत कर्मचारीनिहाय व्यपगत पदे वगळून यापूर्वीची मंजूर ४,७६३ पदे व नवीन ९५३ पदे यासह पालिकेच्या एकूण ५७१६ पदांच्या आकृतिबंधास शासन मान्यता दिली. आकृतीबंधानुसार उपलब्ध होणारी पदे आवश्यकतेप्रमाणे पालिकेच्या आस्थापना खर्चाची ३५ टक्के ही मर्यादा लक्षात घेऊन ही पदे भरण्यात यावीत.
पालिकेच्या आकृतीबंधास मंजूरी मिळाल्यानंतर सेवा भरती नियमांना देखील तातडीने मंजूरी मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र दुसर्या लाटेतील कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने कोरोनावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याकडे प्राधान्याने लक्ष दिले. पालिकेचा आकृतिबंध मंजूर झालेला आहे. आता सेवा भरती नियमांना देखील लवकरच मंजूरी मिळेल. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी सेवा भरती नियमांची संचिका मंजूरीसाठी मंत्र्याकडे पाठवली आहे. मंत्री महोदयांनी सेवा भरती नियमाच्या संचिकेला मंजूरी देताच नोकर भरतीचा मार्ग मोकळा होईल.
महत्त्वाच्या बातम्या
- टायगर श्रॉफच्या ‘हीरोपंती २’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकाची भूमिका साकारणार
- ‘उमरग्यात तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने होणार लहान मुलांचे सर्वेक्षण’- आ. चौगुले
- ओबीसी आरक्षण : ‘राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही आणि थोडेही गांभीर्य दाखविले नाही’
- ‘सरकारला फक्त अल्टिमेटम न देता सर्व मराठा संघटनांना सोबत घेऊन भूमिका मांडा’
- ‘धनंजय मुंडे यांच्यामुळेच मी राजकारणात आले!’, पंकजा मुंडेंचा गौप्यस्फोट


