Share

‘केंद्रात नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली’, अमित देशमुखांचे वक्तव्य

Published On: 

लातूर: केंद्रात नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली. त्यांच्या सत्तेला सात वर्ष झाली. देशातील जनतेचा भ्रमनिराश झाला. गेल्या सात वर्षांत देश मागे गेला, की पुढे गेला? हे तपासण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांमध्ये पालकमंत्री अमित देशमुख यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच केंद्रातील एनडीए सरकारचा सात वर्षांचा कारभार सपशेल अपयशी ठरला. सर्व आघाड्यांवर अन् देशातील जनतेला दिलेली आश्वासने मोदी सरकार पाळू शकले नाही. कोरोना काळात मदत करताना केंद्र सरकारने महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला, असा आरोप देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.

कोरोना काळात गलथान कारभाराचा नमुना केंद्र सरकारने देशाला दाखवला. लसीकरण कोरोना लढ्याला बळ देईल, असे वाटत असताना देशाचे पंतप्रधान इतर राष्ट्रांना लस पुरवत राहिले. अन्य देशांनी लसीच्या बाबतीत प्रथम आपल्या देशाला प्राधान्य दिले. त्यामुळे इस्त्राईल, अमेरिकासारखे देश मास्कमुक्त झाले. आपल्या देशाने लसीबाबत काय धोरण अवलंबले, हे कोणालाच माहिती नाही. कोरोनासारखी राष्ट्रीय आपत्ती मोदी सरकारने ज्या तत्परतेने हाताळायला हवी होती, त्यात हलगर्जी, ढिसाळपणा दाखवल्याने विषाणूने सर्वत्र हातपाय पसरले, असेही या वेळी म्हणाले.

लस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठ्यात कमालीचा बेजबाबदारपणा दाखवल्याने अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला. पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढविल्या, अर्थव्यवस्था खालावली, जीएसटी धोरण, वाढती बेकारी, अशा अनेक आघाड्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरले. शेतकरी आंदोलनावर केंद्र तोडगा काढू शकले नाही. शेतकरी विरोधी काळे कायदे केंद्र सरकार मागे घ्यायला तयार नाही. केंद्र सरकार कोरोना संकटातून पळ काढत असून, मदतीबाबतीत केंद्र महाराष्ट्रासोबत दुजाभाव करीत आहे, असा आरोप मंत्री देशमुख यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!