मुंबई : भारतात ५ G टेक्नॉलॉजी आणण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याअंतर्गत बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने थेट भारतात ५ G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज तिच्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मोबाईल टॉवरमधून निघणा-या हानीकारक रेडिएशनविरोधात जुही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशात या टेक्नॉलॉजीचे संभाव्य धोके बघता तिने यासाठी कायदेशीर मार्ग पत्करला आहे.
५ G टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता,जीव- जिवाणू आणि पर्यावरणावर होणा-या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी तिने संबंधित याचिकेत केली आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अजिबात विरोध नसून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आपले जीवन अधिक सुसह्य झाले आहे, हेही मान्य आहे. आम्ही स्वत:चा रिसर्च केला तेव्हा आरएफ रेडिएशन आपल्यासाठी अतिशय घातक असल्याचे समोर आले आहे.’
जुही चावलाच्या अधिकृत प्रवक्त्याने यासंदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यामागचा हेतूही स्पष्ट करत सांगितले, हा एक अतिशय गंभीर मुद्दा आहे. या गंभीर मुद्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधणे हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. ५ G टेक्नॉलॉजी आपल्या पर्यावरणासाठी किती सुरक्षित आहे हे त्यांनी सांगावे आणि नागरिकांची एकूणच निसर्गाचे आरोग्य लक्षात ठेवून निर्णय द्यावा, अशी आमची इच्छा आहे. आता यावर काय निर्णय येऊ शकतो याकडे सध्या लक्ष असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणासाठी राजकारण बाजूला ठेवून प्रयत्नशील राहू : देवेंद्र फडणवीस
- उस्मानाबादेत घटतीये रुग्णांची संख्या
- दिल्ली कॅपीटल्सनंतर ‘या’ दोन संघाचे कर्णधार बदलले जाणार
- बीड जिल्ह्यात लहान मुलगी व वनरक्षकाची आत्महत्या!
- अखेर तो दिवस आला ! ऑस्ट्रेलियन खेळाडूंची बऱ्याच महिन्यानंतर कुटुंबाशी भेट ; पहा भावुक करणार व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

