🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. मार्च पासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत गेल्याने आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण झाला होता. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आलेख हा उतरता असल्याचं दिसून येत आहे.
मात्र, अद्याप कोरोना स्थिती पूर्णपणे आटोक्यात आली नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध १५ जून पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी रविवारी समाज माध्यमांद्वारे संवाद साधताना राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी काही गावांच्या तरुण सरपंचाचे उदाहरण देत हे तरुण आपलं गाव कोरोनामुक्त करु शकतात तर आपण का नाही? असा प्रश्न करत त्यांनी राज्यातील सर्व गावांना कोरोनामुक्तीची मोहिम हाती घेण्याचं आवाहन केलंय.
दरम्यान, भाजपने मुख्यमंत्र्यांच्या संबोधनावर खोचक टीकास्त्र सोडलं आहे. ‘माझं गाव कोरोनामुक्त हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार?’ असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे.
◾️राज्यांने महीना भरात लस विकत का घेतली नाही?
◾️शिक्षणात क्रांतीकारण निर्णय घेणे गरजेचे म्हणजे परिक्षा न घेणे का?
◾️अर्थचक्र कधी फिरणार?
◾️माझ गाव करोनामुक्त हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार?— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 30, 2021
”नेहमी प्रमाणे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा. ना दिलासा ना विचार किमान उत्तर हवी होती. गेल्या वर्षी निसर्ग वादळाची मदत मिळाली नाही तर यंदाच्या वादळाची मदत कधी मिळणार? महिन्या भरापूर्वी जाहीर केलेल पॅकेज अजून अनेकांना मिळाले नाही ते कधी मिळणार? राज्याने महीना भरात लस विकत का घेतली नाही? शिक्षणात क्रांतीकारण निर्णय घेणे गरजेचे म्हणजे परिक्षा न घेणे का? अर्थचक्र कधी फिरणार? माझ गाव करोनामुक्त हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार?’ अशा प्रश्नांची सरबत्ती उपाध्ये यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘नरेंद्र मोदींवर मी नाराज नाही, त्यांनी मला नेहमीच सन्मान दिला’
- पुणेकरांना मोठा दिलासा; पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांहून खाली ! लवकरच ‘हे’ नियम लागू होणार
- वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील; हसन मुश्रीफ यांचा सूचक इशारा
- …म्हणून फडणवीस शरद पवारांच्या भेटीला गेले असावेत; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं भाष्य
- ‘भाजप दुतोंडी असून आरक्षणविरोधात त्यांची एक वेगळी विचारधारा आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
