औरंगाबाद : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरातील रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. अंशतः लॉकडाऊन, संचारबंदी, कडक निर्बंध, लसीकरणाची वाढती गती यामुळे हळूहळू दररोज येणाऱ्या आकड्यांमध्ये औरंगाबादकरांना आता दिलासा मिळत आहे. गेल्या महिन्यात कोरोनाचा झालेला उद्रेक पाहता महापालिकेनो कोविड सेंटरमध्ये वाढ करण्याचा, मंगल कार्यालय ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता आहे तेच कोविड सेंटर कमी होत असल्याने नवीन जागा ताब्यात घेण्याची गरज नसल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच शहरातील पाच कोविड सेंटर पूर्णतः रिकामे असल्याने पालिकेला मोठा दिलासा मिळत आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला होता. त्यावेळी बंद झालेली कोविड सेंटर सुरु करण्यात आली. १० कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार सुरु होते. मात्र तेही पुरेणासे झाल्यामुळे महापालिकेने आणखी ११ कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यातील आठ सेंटर लगोलग सुरु झाले. त्याचबरोबर शहरातील मंगल कार्यालयांची पाहणी करत मंगल कार्यालय चालकांना ते ताब्यात घेण्यासाठी पत्र देखील देण्यात आले.
याचबरोबर आयडिया सेंटर इत्यादी मोठमोठ्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून शहरातील रुग्ण संख्या निम्म्यावरच आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. सध्यस्थितीत शहरात एकुण १८ कोविड सेंटर असून यातील पाच ठिकाणी शून्यावर रुग्ण संख्या आहे. शहरात एकूण ३ हजार ६८९ रुग्णांची व्यवस्था करण्यात आली होती. यातील २ हजार ४५ बेड रिकामे असून १ हजार ६४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
याठिकाणी शून्य रुग्ण
विद्यापिठातील रमाई, छत्रपती, संत तुकाराम, देवगिरी गर्ल्स हॉस्टेल आणि पीईएस अभियांत्रिकी या पाच कोविड सेंटरवर सध्या एकही रुग्ण नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बेस्ट’ सेवा बजावणाऱ्या सिल्लोडच्या बस वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू!
- राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आंदोलनाचा गिरीश महाजनांकडून समाचार
- आमची लोकं मरायला लागलीत, तुम्ही जीआर काय दाखवताय ? महापालिकेत वसंत मोरेंचा रौद्रावतार
- आर्थिक संकटास कंटाळून शेतमजुराची आत्महत्या!
- कोरोनाकाळात अंत्यविधीच्या नावाखाली लूट केली तर खबरदार, कृष्णप्रकाश यांचा रोखठोक इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

