Share

आर्थिक संकटास कंटाळून शेतमजुराची आत्महत्या!

Published On: 

उस्मानाबाद: कोरोना संकट व लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटास वैतागून शेतमजुराने गळफास घेवून आत्महत्या केली. उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथे सोमवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे मयताच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ढोकी येथील परमेश्वर साहेबराव ससाणे हे गावातील जयभवानीनगर मध्ये किरायाच्या खोलीत राहत होते. परमेश्वर यांनी घरासमोरील पेरूच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. लॉकडाऊनमुळे काम मिळणे मुश्किल झाले होते. त्यातूनच आर्थिक अडचणीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे मुश्किल झाले होते.या निराशेतूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान, आधी दुष्काळमुळे संकटात सापडलेला शेतकरी आता वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा करावी, अन्यथा येणाऱ्या काळात आणखीन शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!