Share

पुण्यातील कोविड सेंटरबाबत किरीट सोमय्यांनी केला ‘हा’ मोठा आरोप

Published On: 

पुणे: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पुण्यात आले होते. दरम्यान किरीट सोमय्या पुण्यात येताच पुणे शहरातील शिवसैनिकांनी चांगलाच राडा घातला. यामध्ये किरीट सोमय्यांना धक्काबुक्की देखील करण्यात आली. यामध्ये सोमय्या जखमी झाले असून ते शहरातील संचेती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यात जम्बो कोविड सेंटरच्या (Pune Jambo Covid Centre) कामात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केलाय. तसेच याबाबत काही कागदपत्रे सादर करत कोविड सेंटरचा काम मिळालेली कंपनी आणि पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) तक्रार दाखल केली आहे. तसेच ठाकरे सरकारने लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केलं आहे, असा आरोप देखील सोमय्या यांनी लावला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, या कोविड सेंटर घोटाळ्या संबंधित कागदपत्रेच दिली जात नव्हती. ही कागदपत्रे शोधायला मला १२३ दिवस लागले. जवळपास २०० माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केले. ते गोलगोल फिरवत होते. याबाबत पीएमआरडीने नियुक्ती केली. त्यावर १० दिवसात पुणे मनपाने आक्षेप घेतल्याने लोकांचे जीव वाचले आहेत. जेव्हा वैद्यकीय आणीबाणी घोषित झाली तेव्हा सर्व अधिकार अधिकाऱ्यांकडे होते. चूक कोणीही केलेली असो, याची चौकशी करायला हवी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!