Share

औरंगाबाद पालिका ऑन ‘हाय अलर्ट’; ऑमिक्रॉनच्या रुग्णांसाठी ७५ बेडचे कोविड सेंटर सुरु करणार!

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्याने आलेल्या ऑमिक्रॉन या विषाणूने सर्वत्र मोठा धुमाकूळ घातलेला आहे. देशासह राज्यात आणि जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणा कामाला लागलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता औरंगाबाद महापालिकेनेही ऑमिक्रॉनशी मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहरातील आयओसी सेंटरमध्ये ७५ बेडचे कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजनचीही व्यवस्था असणार आहे.

महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी याबाबत अधिक माहिती दिली. २२ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल दोन्ही वेळेस निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा जीव भांड्यात पडल्याची प्रतिक्रिया डॉ. मंडलेचा यांनी दिली. तसेच या व्यक्तीपासून शहराला कुठलाही धोका नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र ऑमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर तयारी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर विशेषतः ऑमिक्रोनमुळे वेगळ्या प्रकारचे कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे. मात्र अजूनही शहरातील प्रयोगशाळेमध्ये ओमिक्रॉन संसर्ग चाचणी करण्यासाठीची सोय नाही. त्यामुळे शहरातील स्वॅब थेट पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. या विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात विमानतळ, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. विशेषतः परदेशातून आलेल्या प्रवाशांवर विशेष लक्ष दिले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!