उस्मानाबाद: जिल्ह्यात गेल्या महिनाभरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. मात्र आता कोरोना बाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. त्याच सोबत कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्याने येथील नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र अजूनही कोरोनाचे संकट गेले नसल्याने काळजी घेणे तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन येथील प्रशासन नागरिकांना देत आहे.
जिल्ह्यातील ६८७ रुग्ण रविवारी बरे होऊन घरी परतले आहेत तर नवीन ४९२ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच उपचारादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आता रुग्णसंख्या वरचेवर कमी होत आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारीही बाधित रुग्णांपेक्षा डिस्चार्ज घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रविवारी विविध रुग्णालयातून यशस्वीपणे उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या ६८७ आहे तर नवीन नोंद झालेल्या रुग्णांची संख्यसा ४९२ आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत उस्मानाबाद तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे १९६ रुग्ण आहेत. तुळजापूर ७०, उमरगा २०, लोहारा ३०, कळंब ३८, वाशी ५१, भूम ३२ तर परंडा तालुक्यात ५५ रुग्ण आढळले आहेत. यामुळे आता उपचाराखालील रुग्णांची संख्या पाच हजार ६८७ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णसंख्या ४८ हजार ९५६ वर गेली आहे. रविवारी बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६८७ असून आतापर्यंत एकूण ४२ हजार १५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात रविवारी सहा कोेरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १११४ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजितदादा मंत्रालयात आले, आता मुख्यमंत्री ‘वर्क फ्रॉम मंत्रालय’ कधी करणार ?’
- पुण्यात गँगवारमध्ये मृत्यू झालेल्या गुंडाच्या अंतयात्रेला १२५ दुचाकी; ८० जणांना अटक
- धोनीच्या अंदाजात हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना तोडंघशी पडला फलंदाज
- तुळजापुरात होणार मोफत अंत्यसंस्कार!
- वाढदिवस विशेष ‘अग्निहोत्र’ मधील ‘मंजुळा’ ते ‘बंदीशाळा’तील ‘जेलर’ मुक्ता बर्वेचा थक्क करणारा प्रवास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

