Share

तुळजापुरात होणार मोफत अंत्यसंस्कार!

Published On: 

उस्मानाबाद: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र चांगलेच थैमान घातले आहे. या लाटेने अनेकांचे जीव घेतले आहेत आणि अजूनही मृत्यूसत्र सुरूच आहे. मृत्युसंख्या इतकी वाढली आहे की आता स्मशानभूमीत देखील ‘वेटिंग’ सुरु झाले आहे. यामुळे मृत रुग्णाच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधी रुग्णाला वाचवण्यासाठी धडपड त्यानंतर रुग्ण वाचला नाही तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी धडपड, नातेवाईकांची होणारी फरफट आता जरा कमी होण्याची शक्यता आहे. अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च देखील आता द्यावा लागणार नाही.

कोरोना रुग्णांच्या मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने अंत्यविधीसाठी प्रशासकीय यंत्रणेला विलंब लागत असून मृतांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवक नेते विनोद गंगणे, नगरसेवक पंडितराव जगदाळे आणि आनंद कंदले यांनी पुढाकार घेत धार्मिक प्रथेनुसार अंत्यविधीसाठीची सर्व तयारी स्वखर्चाने करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मोतीझरा स्मशानभूमीत ५० मेट्रीक टन जळणाची व्यवस्था केली आहे. दरम्यान, कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यविधीसाठी पाच हजार रुपयांचा खर्च होत असून तुळजापूर नगरपालिका वर्षभरापासून मोफत अंत्यविधी करत आहे.

तुळजापूर येथील स्मशानभूमीत दररोज सरासरी ४ रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. हिच संख्या काही दिवसांपूर्वी ८-१० होती. पालिकेच्या पथकाला शासकीय नियमानुसार एका पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास एक तास लागतो. यामुळे नातेवाईकांना तिष्ठत थांबावे लागते. मात्र, आता सामाजिक पुढाकारामुळे जास्तीचे कामगार लावून सरण रचून ठेवण्यात येणार आहे. शिवाय आवश्यक डिझेल पुरवण्यात येणार असून अंत्यविधी वेगाने होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!