🕒 1 min read
मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याच्या वेगळ्या शैलीसाठी जागतीक क्रिकेट मध्ये प्रसिद्ध आहे. मग त्याची फलंदाजी असो वा यष्टिरक्षण प्रत्येक प्रकारात त्याने स्वत:चा एक वेगळाच अंदाज दाखवला आहे. फलंदाजीत त्याने हेलिकॉप्टर शॉट चा त्याने अविष्कार केला होता.
हा शॉट खेळण्याचा प्रयत्न अनेक खेळाडूंनी केला मात्र यश काहीच फलंदाजांना आले. यात हार्दिक पांड्या आणि राशिद खान यांनी हा शॉट यशस्वीपणे खेळुन दाखवला आहे. यानंतर इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काउंटी क्रिकेट स्पर्धेतील एसेक्स आणि डर्बीशायर या संघादरम्यान पार पडलेल्या सामन्यात एका फलंदाजाने हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. या सामन्यात एसेक्सकडून डेन लॉरेन्सने १५० धावा पुर्ण करण्यासाठी हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला आणि तो खाली कोसळला.
Check out the crashed helicopter shot ???? ???? from @DanLawrence288 to bring up his 150! pic.twitter.com/Is6EGZtKl6
— Edges & Sledges Cricket Podcast (@1tip1hand) May 15, 2021
हेलिकॉप्टर शॉट खेळताना पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर तुफान व्हायरल होत आहे. एसेक्स आणि डर्बिशायर या संघादरम्यान झालेल्या या सामन्यात एसेक्सने प्रथम फलंदाजी करत ३ बाद ४१२ धावांचा डोंगर उभा केला. या डावात डेन लॉरेन्सने धडाकेबाज खेळी करत दिडशतकी खेळी साकारली. लॉरेन्सने १३३ चेंडुत नाबाद १५२ धावांची खेळी केली. यात त्याने १६ चौकार आणि ६ षटकार लगावले. या सामन्यात एसेक्सने एक डाव आणि १५ धावांनी विजय संपादन केला.
महत्वाच्या बातम्या
- वाढदिवस विशेष ‘अग्निहोत्र’ मधील ‘मंजुळा’ ते ‘बंदीशाळा’तील ‘जेलर’ मुक्ता बर्वेचा थक्क करणारा प्रवास
- ‘बॉल टेम्परिंग बद्दल गोलंदाजांना माहित होते’ ; बॅनक्रॉफ्टच्या विधानावर माजी ऑस्ट्रेलियन कर्णधारचा धक्कादायक खुलासा
- करण जोहरच्या मुलांनी केली पावसाळ्याची तयारी; सोशल मिडियावर पोस्ट केला फोटो
- उस्मानाबादेत ऑक्सिजन पुरवठा होतोय सुरळीत
- ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटामुळे संजय लीला भन्साळी यांना दिवसाला ३ लाख रुपयांचा होतोय तोटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
