पुणे : पुण्यात गुंडाची सुटका झाल्यानंतर जेलबाहेर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी तुम्ही पाहिली असेल, त्यानंतर थाटामाटात मागे पुढे चारचाकी गाड्यांसह भाऊंचे स्वागत करण्यासाठी मित्र परिवार आलेला असतो. आता पुण्यातील एका सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
सध्या पुण्यासह संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातलेले असताना माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराच्या अंतयात्रेला शेकडो तरुण दुचाकी घेवून ‘लव यू भाऊ’ असं म्हणत रस्त्यावर येवून त्यांनी दु:ख व्यक्त केलं, या घटनेची पुणे शहरातमधील नागरिकांमध्ये चर्चा आहे. पुण्यात दिवसेंदिवस भाई वाढतायत ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलं जात आहे.
पुण्यातील माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराची शनिवारी पहाटे हत्या झाली होती. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याने वादानंतर टोळक्यानं बिबवेवाडी इथं सरोजिनी क्लिनिकसमोर माधव वाघाटे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर आणि पोलिसांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिवाचं रान केलं जात आहे. अशातच सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 बाईकची रॅली काढल्याचं समोर आल्याने संताप व्यक्त केला जात होता.
धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या प्रकरणी १५० ते २०० जणांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सिद्धार्थ पलंग, कुणाल चव्हाण, सुनिल खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषिकेश भगत, गणेश फाळके अशा वाघाटेच्या साथीदारांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या
- धोनीच्या अंदाजात हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना तोडंघशी पडला फलंदाज
- ‘बॉल टेम्परिंग बद्दल गोलंदाजांना माहित होते’ ; बॅनक्रॉफ्टच्या विधानावर माजी ऑस्ट्रेलियन कर्णधारचा धक्कादायक खुलासा
- करण जोहरच्या मुलांनी केली पावसाळ्याची तयारी; सोशल मिडियावर पोस्ट केला फोटो
- उस्मानाबादेत ऑक्सिजन पुरवठा होतोय सुरळीत
- ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटामुळे संजय लीला भन्साळी यांना दिवसाला ३ लाख रुपयांचा होतोय तोटा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

