पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम आता दिसू लागला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात नव्याने ४ हजार ६३१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा कालच्या कोरोना रुग्ण बाधितांपेक्षा अधिक असला तरी कोरोना मुक्तांची संख्या अधिक असल्याने दिलासा कायम आहे.
सलग सातव्या दिवशी कोरोनामुक्त अधिक !
पुणे मनपा हद्दीत आज सलग सातव्या दिवशी नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. आज नवे रुग्ण ४,६३१ तर कोरोनामुक्त ४,७५९ नोंदवले गेले. आपल्या शहरासाठी पुढील आठवडा अत्यंत महत्त्वाचा असून सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे.
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) April 25, 2021
आज सलग सातव्या दिवशी कोरोना मुक्तांची संख्या ही बाधितांपेक्षा अधिक आहे. आज ४ हजार ७५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. अशातच, राज्य सरकारने कडक लॉकडाऊन लागू केल्यामुळे शहरातील बाधितांची संख्या कमी होण्यास अधिक वेग येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशीच रुग्णसंख्या घटत राहिल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ‘आता नको कोणतीही ढिलाई, बाकी आहे मोठी लढाई !’ असं आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं असून पुढील आठवडा शहरासाठी महत्वाचा असून सर्वांचं सहकार्य अपेक्षित असल्याचे देखील मोहोळ म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन; फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
- ठरलं ! राज्यात १८ वर्षांपुढील व्यक्तींचे मोफत लसीकरण; जितेंद्र आव्हाडांची माहिती
- नेत्यांच्या कार्यक्रमांना कोरोनाची दांडी ? ज्ञान पाजळणाऱ्या भाजप नेत्यांवर कारवाई होणार का ?
- ज्याच्यासाठी कमावलं तोच कोरोनाने हिरावला; वृद्ध दाम्पत्य FD मोडून करतंय कोरोना रुग्णांना मदत
- दुर्घटनांमध्ये अधिक रुग्णांचे मृत्यू व्हावेत अशी राजेश टोपेंची इच्छा आहे का ? भाजप नेत्याचा संतप्त सवाल


