मुंबई : राज्यासह देशभरात कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून राज्य सरकारने स्वतः ऑक्सिजन निर्मितीची वाढ करण्यासह केंद्राकडे मदत मागितली आहे. केंद्र सरकारने राज्यासाठी मोठी मदत उपलब्ध करून दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून दिल्यानंतर केंद्राने आता ऑक्सिजनचा पुरवठा देखील अधिक केला आहे. हा पुरवठा जवळपास इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळेच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
‘महाराष्ट्रातील नागरिकांना दिलेल्या सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेकाअनेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८४ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे,’ असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांचे अनेकानेक आभार.
महाराष्ट्राला सर्वाधिक 1785 मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात,उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे.#Oxygen— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 25, 2021
ऑक्सिजन निर्मितीसाठी केंद्राने दिलेला निधी राज्य सरकारने गायब केला – प्रसाद लाड
‘कोरोना महामारीच्या काळात कोणत्याच राज्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता भासू नये, प्रत्येक राज्य या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2021 मध्ये राज्य सरकारांना पत्रे पाठवली होती. त्यानुसार ‘पीएम केअर’ निधीतून महाराष्ट्राला 10 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी निधी देण्यात आला. मात्र, गेल्या 4-5 महिन्यात या निधीचा वापर करून राज्य सरकारने एकही प्रकल्प सुरु केला नाही. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे’ असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी त्या रुग्णांच्या मृत्यूला राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

