बीड: कोरोनाची दुसरी लाट सगळीकडे चांगलेच थैमान घालत आहे. गेल्या वर्षी पेक्षा या वेळेस कोरोना शहरांसोबतच ग्रामीण भागातही अधिक पसरत असल्याचे बघायला मिळत आहे. रुग्णांची संख्या दुपटीने वाढत असली तरी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाहीये. त्याच सोबत आणखी एक चांगली बाब अशी की एका ८० वर्षांच्या आजींनी या कोरोनावर मात केली आहे.
बीपी, शुगर असून आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. एका लग्न सोहळ्यात गेल्या असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आडस येथील राजकुमारी पितांबरसिंह पवार (८० ) या भावकीतील लग्न सोहळ्याला परिवारासह उपस्थित होत्या. पवार कुटुंबीयांनी १० एप्रिल रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजन टेस्ट केली असता राजकुमारी पवार यांच्यासह घरातील दोन सदस्य पॉझिटिव्ह आले. या सर्वांना लोखंडी सावरगाव येथील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मधुमेह, रक्तदाब असे आजार आणि त्यात ८० वर्ष वय असे असून देखील या आजींनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर चार दिवसात कोरोनावर मात करत ठणठणीत बऱ्या देखील झाल्या. कोरोनाची मोठी भीती बाळगणाऱ्या तरुणांसाठी हा एक आदर्शच म्हणावा लागेल. त्यांच्या घरात ५ कोरोना बाधित रुग्ण असून ते ठणठणीत आहेत. दोन रुग्ण तर डॉक्टरांच्या सल्ल्याने होम आयसोलेट राहूनच उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून ‘त्या’ रात्री अनिल देशमुखांच्या घरी अचानक सीबीआयचे अधिकारी पुन्हा आले
- ‘राज्यातील जनतेपेक्षा ममतांना त्यांचा अहंकार महत्त्वाचा’
- गोडावून फोडून १ लाखाचे साहित्य लंपास, पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल
- भयावह! अंबेजोगाईत एकाच वेळी २८ जणांवर अंत्यसंस्काराची वेळ
- नशेच्या गोळ्या विकणाऱ्याची पोलिस कोठडीत रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

