Share

भयावह! अंबेजोगाईत एकाच वेळी २८ जणांवर अंत्यसंस्काराची वेळ

Published On: 

बीड: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झापाट्यांने वाढ होत आहे, ऑक्सिजन रेमडिसेविरचा प्रचंड तुटवटा भासत आहे. त्यातच बीडमध्ये कोरोनाचा उद्रेक होत आहे. दुसऱ्या लाटेचा फटका बसत आहे. बीडच्या अंबाजोगाईत ३० कोरोना रुग्णांचा दि.२४ एका दिवसात मृत्यू झाला आहे. दुसरे भयावह वास्तव म्हणजे यातील 28 जणांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे एकाचवेळी अनेकांवर अंत्यसंस्काराची वेळ आली. त्यामुळे कोरोनाचे हे मृत्यूतांडव अनेकांना धडकी भरवत आहे. अनेकांना आपल्या जवळच्या लोकांना यात गमवावं लागत आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन जाण्याचे प्रमाण सर्वाधिक असले तरी मृत्यूचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. अंबाजोगाईत ३० जणांचा मृत्यू झालेल्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला तर दोन मृतांचा दफनविधी करण्यात आला. तसेच एकाच वेळी २८ जणांना अग्नीडाग दिल्याने अंबाजोगाई हळहळले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना बळीची संख्या वाढत चालल्याने भय इथले संपत नाही, अशीच परिस्थिती होत चालली आहे. पुन्हा एकदा अंबाजोगाईत मृत्युचा तांडव सुरु झाला आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी निदान आता तरी गर्दी टाळून कोरोनापासून दूर झाले पाहिजे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची मोठी शक्यता आहे.

या आधीही अंबाजोगाईत असं चित्र बघायला मिळालं होतं. स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या ८ जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ येथील नगर पालिकेवर आली होती. अंबाजोगाई नगर पालिकेने पठाण मांडवा रस्त्यावरील कोव्हिड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर या ८ जणांना अग्निडाग दिला. यामध्ये एक महिला असून सर्व मयत रुग्ण ६० वर्षापुढील आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!