Share

कीर्तनकारासोबत अश्लील व्हिडिओ व्हायरल! महिलेने घेतले विष; औरंगाबादेतील घटना

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेली अनेक वर्षे पंचक्रोशीत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले वैजापूर तालुक्यातील 48 वर्षीय महाराज आणि सिल्लोड तालुक्यातील चाळीस वर्षीय महिला यांचा एक अश्लील व्हिडिओ सध्या जाम व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडिओत शारीरिक संबंध प्रस्थापित करत असताना हे दोघे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.

वारकरी संप्रदाय संघटनेकडून या कीर्तनकार महाराजावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. सदर प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने आपली बदनामी होत असल्याचे लक्षात येताच या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेवर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान या कीर्तनकार महाराजांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज डोणगावकर यांनी व्हिडीओमध्ये असलेल्या कीर्तनकार महाराज आणि महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत शिल्लेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. आपल्या किर्तनातून भक्ती व समाजप्रबोधन करत असल्यामुळे लाखो लोक त्यांना आपले आदर्श मानतात. मात्र या दोघांनीही त्या लाखो श्रध्दाळू लोकांच्या धार्मिक भावनांवर मोठा आघात केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

सोमय्यांना पोलिसांची नोटीस, सोमय्या दिल्लीला रवाना

पवारांना इनामात ब्रिटिश सोडून गेले की महात्मा गांधी?; निलेश राणेंचा खोचक सवाल

“…तरच धार्मिक तेढ वाढविणारी ‘ब्लू प्रिंट’ अपयशी ठरेल”, राष्ट्रवादीचा हल्लाबोल

शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा मी निषेध करते- ममता बॅनर्जी

IPL 2022: अमित मिश्राने उडवली CSKची खिल्ली; म्हणाला ‘संघात खेळायला मी अजून दोन वर्षे…’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!