Share

पवारांना इनामात ब्रिटिश सोडून गेले की महात्मा गांधी?; निलेश राणेंचा खोचक सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या (sharad pawar) निवासस्थानावर काल (८ एप्रिल) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेकही केली. यानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री आदित्य ठाकरे आणि इतरही मंत्री शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावरूनच भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्वीट करत खोचक सवाल केला आहे.

“एकही काच फुटली नाही किंवा घराचं नुकसान झालं नाही तरी राज्याचे गृहमंत्री आणि ॲडिशनल CP पवार साहेबांच्या घरी पोहोचले. पोलीस अधिकारी घरात जाऊन तपासा बद्दल माहिती देण्यासाठी पवार कुटुंबाने महाराष्ट्राला विकत घेतला आहे का? पवारांना इनामात ब्रिटिश सोडून गेले की महात्मा गांधी?”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान एसटी कामगारांच्या आडून काही राजकीय शक्ती हिंसा घडविण्याचा काम करत आहे. महिलांना पुढे करून मॉब तयार करण्यात आला आहे, यामुळे पोलिसांना कारवाई करता आली नाही. खरंच आंदोलक होते का? याचा शोध करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी १०४ कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunratna Sadavarte) यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या:

शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा मी निषेध करते- ममता बॅनर्जी

IPL 2022: अमित मिश्राने उडवली CSKची खिल्ली; म्हणाला ‘संघात खेळायला मी अजून दोन वर्षे…’

“राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांकडूनच हल्ल्याचं समर्थन” – संजय राऊत

“शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजपच”; संजय राऊत यांचा आरोप

IPL 2022: पंजाबच्या पराभवानंतर सेहवागचा मयंकला खास सल्ला; म्हणाला ‘तू कॅप्टन आहेस हे विसरून जा…’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!