मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. यानंतर पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरेंच्या या भाषणावर नाराजी व्यक्त केली. तद्पश्चात त्यांची शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर पुण्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. असे असतांनाच या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरेंवर तसेच मनसेवर अप्रत्यक्ष टीका करण्यात आली आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली असून त्यामध्ये म्हंटले आहे की,‘धार्मिक विद्वेष पसरवून, समाजा-समाजात तेढ निर्माण करुन आपली राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील एक राजकीय पुढारी करत आहेत. पण त्यांच्याच पक्षातील एका नेत्याने “मतदारसंघातील मुस्लिमांशी माझी नाळ जोडली गेलीय, आता त्यांच्याच दारासमोर जाऊन भोंगे वाजवू का?” अशा प्रश्न उपस्थित करत धर्मांध राजकारणाला एकप्रकारे नकार दिला आहे. या भूमिकेसाठी संबंधित व्यक्तीला आपले पद गमवावे लागले तरी त्याने आपली भूमिका सोडली नाही.’
दरम्यान, पुढे म्हंटले आहे की, ‘आज देशात धर्माच्या नावाने जो उच्छात मांडला जात आहे, तो थांबवायचा असेल तर राज्य आणि देशातील प्रत्येकाला लोकशाहीची बूज राखणारी भूमिका घ्यावी लागेल. तरच धार्मिक तेढ वाढविणारी ‘ब्लू प्रिंट’ अपयशी ठरेल.’
महत्वाच्या बातम्या
- मुस्लिम समाजाच्या मोर्चामुळे वसंत मोरेंना प्रचंड वेदना
- “…तर त्यांनी मुंबईच्या सीपींना त्वरित राजीनामा देण्यास सांगावे”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नितेश राणेंची मागणी
- IPL 2022: सर जडेजाची चेन्नई सुपर किंग्ज कुल विल्यमसनच्या हैदराबादला भिडणार; जाणून घ्या कोणाचे असेल वर्चस्व
- “सरकारने एसटी कामगारांबद्दल सहानुभूती दाखवावी सुडाची कारवाई…”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया
- “निवडणूक राजकीय शर्यत असली तरी त्यात खिलाडूवृत्ती असावी दुर्दैवाने भाजप…”, अशोक चव्हाण यांची टीका


