मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय रॅपर म्हणून हनी सिंगला ओळखले जाते. हनी सिंगचं खरं नाव हिरदेश सिंग असं आहे. त्याचा आज ३७ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. १९८३ साली पंजाबमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे संघर्ष हा असतोच. तसेच हनी सिंग याला यश मिळण्याआधी त्याला करिअरच्या सुरुवातीला एक वेळच्या जेवणासाठी सुद्धा संघर्ष करावा लागत होता.
लहानपणापासूनच हनी सिंगला गाण्याची प्रचंड आवड होती. शालेय स्पर्धा व सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गाणी गाऊन तो आपली ही आवड पुर्ण करत होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर गायक म्हणून काम मिळवण्यासाठी तो मुंबईत आला. सुरुवातीला एका रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये त्याला भांगडा प्रोड्युसर म्हणून काम मिळालं होतं. या कामासाठी त्याला केवळ २ हजार रुपये पगार मिळत होता. त्यामुळं तो अनेकदा ऑफिसमध्येच झोपत असे, तर रस्त्यावर मिळणारं अन्न खात असे. पुढे हळूहळू त्यानं पैसे जमा केले व मुंबईतील वांद्रे येथे एक फ्लॅट भाड्यानं मिळवला . या ठिकाणी तो आपल्या आणखी दोन मित्रांसोबत राहत होता. त्यांच्या मदतीनं त्यानं काही गाणी रेकॉर्ड केली आणि ती गाणी घेऊन तो म्युझिक कंपन्यांकडे जायचा.
पेशी या म्युझिक अल्बमची २००५ साली त्याने निर्मिती केली होती. त्याचा हा अल्बम थंडर या म्युझिक कंपनीला आवडला. त्यानंतर त्यांनी या अल्बमच्या ब्रॉडकास्टिंगची जबाबदारी स्विकारली आणि हा अल्बम सुपरहिट झाला. परिणामी हनी सिंगला रातोरात प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यानं ‘हाई हील्स’, ‘ब्रेकअप पार्टी’, ‘ब्रिंग मी बॅक’, ‘ब्लू आईज’, ‘इसे कहते हैं हिप हॉप हिप हॉप’, ‘देसी कलाकार’, ‘रानी तू मैं राजा’, ‘पार्टी ऑन माई माइंड’, ‘लुंगी डांस’, ‘बॉस टाइटल ट्रेक’, ‘पार्टी ऑल नाईट’, ‘सनी सनी’, ‘चार बोतल वोडका’, ‘पार्टी विद भूतनाथ’, ‘अता माझी सटकली’, यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांची निर्मिती केली. हल्लीच्या तरुणीला रॅप सॉंगची अधिकच भुरळ पडली आहे. त्याचे हे अल्बम तरुणीमध्ये अधिकच लोकप्रिय ठरली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- आमदारांना लॅपटॉप, गरीब विद्यार्थ्यांना का नाही?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात तक्रार
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
