🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉकअप’ शो मध्ये अंकिता लोखंडेने हजेरी लावली होती. यावेळी कंगनानं अंकिताला, या शोमध्ये सर्वजण आपली गुपितं शेअर करतात तर तुलाही यावेळी असं करावं लागेल असं सांगितलं. त्यावेळी अंकिताने एक गुपित शेअर केला आहे. ती म्हणाली याबाबत तिनं अद्याप पती विकीलाही काहीच सांगितलेलं नाही, आणि तिनं आपण गरोदर असल्याचं सांगितलं…माझं अभिनंदन करा कारण मी गरोदर आहे. असं म्हणत तिनं सर्वांनाच धक्का दिला.
अंकिता लोखंडे गरोदर असल्याचं म्हटलं जात असल्यामुळं सध्या अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. कारण अवघ्या तीनएक महिन्यांतच ही गोड बातमी अनेकांनाच अपेक्षित नव्हती.
अंकितानं लोखंडेनं तिचं गुपित तर उघड केलं. पण लगेचच ती म्हणाली, ‘एप्रिल फूल’ अंकिता हसत हसत कंगनाला म्हणाली, ‘मी तुला एप्रिल फूल करत होते. खरं तर माझं आयुष्य एखाद्या उघड्या पुस्तकाप्रमाणे आहे. ज्यात कोणतंही सीक्रेट नाही.’ अंकिताचं बोलणं ऐकून सर्वांनाच हसू आलं. दरम्यान अंकिता लोखंडेनं पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वाच्या प्रमोशनसाठी ‘लॉकअप’ शोच्या मंचावर हजेरी लावली होती. लवकरच या मालिकेचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
“जिल्हाध्यक्ष हटाव राष्ट्रवादी काँग्रेस बचाव” – पोस्टर्समुळे उडाली खळबळ
IPL 2022: ललित यादवच्या रन आऊटवरून गोंधळ; पंतची अंपायरशी हुज्जत, वाचा नेमके काय झाले?
अभिनेत्री शर्मिला शिंदेची वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर प्रतिक्रिया
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचा जोरदार टोला; म्हणाले,“आता धौती योग घेतल्याशिवाय पर्याय नाही”
“राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडूळ निघाले” – किशोरी पेडणेकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
