🕒 1 min read
नवी दिल्ली : आयपीएल २०२२ हंगामाला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने रविवारी ६ मार्चला साखळी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. चेन्नई सुपर किंग्जनेही आयपीएलच्या १५ व्या हंगामाची जोरदार तयारी सुरू केली आहे. . सीएसके आपला या हंगामातील पहिला सामना २६ मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळणार आहे.
महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत चार वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. आता या वर्षी देखील विजेतेपदाच्या शर्यतीत चेन्नईचा संघ आहे. या वर्षी विजेतेपद मिळवल्यास सीएसके मुंबई इंडियन्सच्या विक्रमी ५ विजेतेपदाशी बरोबरी करेल. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा उपांत्यपूर्व आणि सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत पोहोचलेला संघ या वर्षी काय कमाल करतो याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. चेन्नईचा संघ या वर्षी मुंबईत ११ तर पुण्यात ४ सामने खेळणार आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात सीएसकेचे या हंगामातील वेळापत्रक,
सीएसकेचे वेळापत्रक २०२२ :
२६ मार्च – विरुद्ध – कोलकाता नाईट रायडर्स – वानखेडे स्टेडियम – रात्री ७.३०
३१ मार्च – विरुद्ध – लखनौ सुपर जायंट्स – ब्रेबॉर्न स्टेडियम – रात्री ७.३०
०३ एप्रिल – विरुद्ध – पंजाब किंग्ज – ब्रेबॉर्न स्टेडियम – रात्री ७.३०
०९ एप्रिल – विरुद्ध – सनरायझर्स हैदराबाद – डीवाय पाटील स्टेडियम – रात्री ७.३०
१२ एप्रिल – विरुद्ध – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – डीवाय पाटील स्टेडियम – रात्री ७.३०
१७ एप्रिल – विरुद्ध – गुजरात टायटन्स – एमसीए स्टेडियम पुणे – रात्री ७.३०
२१ एप्रिल – विरुद्ध – मुंबई इंडियन्स – डीवाय पाटील स्टेडियम – रात्री ७.३०
२५ एप्रिल – विरुद्ध – पंजाब किंग्ज – वानखेडे स्टेडियम – ७.३०
०१ मे – विरुद्ध – सनरायझर्स हैदराबाद – एमसीए स्टेडियम पुणे – रात्री ७.३०
०४ मे – विरुद्ध – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – एमसीए स्टेडियम पुणे – रात्री ७.३०
०८ मे – विरुद्ध – दिल्ली कॅपिटल्स – डीवाय पाटील स्टेडियम – रात्री ७.३०
१२ मे – विरुद्ध – मुंबई इंडियन्स – वानखेडे स्टेडियम – रात्री ७.३०
१५ मे – विरुद्ध – गुजरात टायटन्स – वानखेडे स्टेडियम – रात्री ७.३०
२० मे – विरुद्ध – राजस्थान रॉयल्स – ब्रेबॉर्न स्टेडियम – रात्री ७.३०
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
