Share

‘सुशांतसिंग प्रकरण म्हणजे महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान’ ; मलिकांचा घणाघात

Published On: 

मुंबई : चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला एक वर्ष पूर्ण झाले असून, अद्याप सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. यामुळे आता विरोधकांनी महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला आहे. सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये ही हत्या की आत्महत्या होती हे सीबीआयने एक वर्ष झाले तरी स्पष्ट केले नाही. याचा अर्थ महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

तसेच ‘वर्ष उलटून गेले तरी सीबीआयने कोणताच खुलासा केला नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. एखादी घटना घडली की त्या – त्या राज्यात तपास राहतो मात्र सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात बिहार सरकारने त्यांच्या हद्दीत हत्येचा गुन्हा दाखल करुन प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी दिले होते. सीबीआय एक वर्ष या प्रकरणाचा तपास करतेय आणि अजून ही हत्या की आत्महत्या हे सांगू शकलेली नाही, असे मलिक म्हणाले. बिहार निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच सुशांतप्रकरण रंगवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

तर काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील याच मुद्द्याला धरून काही सवाल केले होते. ‘सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अद्याप सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. त्याच्यामागे कोणाचा दबाव तर नाही ना? महाराष्ट्रातील तपास जाणीवपूर्वक अंतहीन ठेवण्याचे मोदी सरकारचे आदेश आहेत का? हे सीबीआयने तत्काळ स्पष्ट करावे,’ अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!