Share

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींचा जोरदार टोला; म्हणाले,“आता धौती योग घेतल्याशिवाय पर्याय नाही”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chnadrakant Patil) यांनी आज (३ एप्रिल) कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कालच्या भाषणावर मत व्यक्त केले. तसेच राज ठाकरेंच्या भाषणातून बाळासाहेब ठाकरेंची आठवण झाली, असेही पाटील म्हणाले. दरम्यान, चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावर आता आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात अमोल मिटकरी यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘चंद्रकांत पाटील म्हणतात राज बोलले बाळासाहेब आठवले. पण बाळासाहेबांचे पुत्र विधानसभेत गरजले तेंव्हाच तुम्हाला प्रबोधनकार व बाळासाहेब दोन्ही आठवले असतील. ज्यामुळे तुमची अवस्था “मळमळतय मी तळमळतय मी” अशी झाली असुन आता धौती योग घेतल्याशिवाय पर्याय नाही’, असे मिटकरी म्हणाले.

दरम्यान, ‘कोल्हापुरकरांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने थेट पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याचे स्वप्न दाखवले. हे दाखवताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी घोषणा केली होती की, पुढच्या दिवाळीला कोल्हापुरकरांची अंघोळ थेट पाइपलाइन द्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याने घालू. पण मुळात थेट पाईपलाईनचे पाणी पिण्यासाठी आहे, अंघोळीसाठी नाही,’ असा टोलाही पत्रकार परिषदेत बोलत असतांना चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!