नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. 11 बैठका होऊन सुद्धा आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. सरकार चर्चेची दारं खुली असल्याचं सांगत आहे मात्र कायदे मागे घेण्याबाबत अजिबात तयार नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला या कायद्यांना विरोध करणारे शेतकरी मात्र कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसल्याचे दिसून येत आहे.
सुरुवातीपासूनच या आंदोलनाच्या समर्थनार्थ काही सेलिब्रिटी पुढे आले होते. आता या देशी सेलिब्रिटीज बरोबर काही परदेशी सेलिब्रिटी सुद्धा समर्थनार्थ पुढे आले आहेत. पॉप सिंगर रिहानाने समर्थनार्थ ट्वीट केल्यानंतर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका व सेलेब्रिटी रिहाना, पर्यावरण चळवळीतली आघाडीची कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने ट्विट केल्याने मोदी सरकार हादरले.

दरम्यान भारतीय सेलीब्रेटीकडून या आंतरराष्ट्रीय ट्वीटवर आक्षेप घेत हा आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचा म्हटलं आणि सरकारला पाठींबा दिला आहे. मात्र आता शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या रीहानाला ट्वीटर कडून देखील समर्थन देण्यात आले आहे.

ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांनी रीहानाच्या या ट्विट ला लाईक केले आहे. तर नुकतच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अंतर्गत विषयांवर वक्तव्य केल्याने रीहना आणि ग्रेटा यांना फटकारले होते. त्यामुळे ट्वीटर देखील सरकारच्या रडारवर येणार का ? या आधी देखील ट्वीटर भारतात वादात सापडले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अखेर शेतकरी आंदोलनावर समलमान खानने सोडले मौन, म्हणाला…
- मध्यम वर्गीयांचा अपेक्षाभंग; आरबीआयकडून पतधोरण जाहीर !
- प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होत असलेल्या नाना पटोले यांना ‘या’ आव्हानांचा करावा लागू शकतो सामना
- पुण्यामध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर! 93 रुपये प्रति लीटरने होतेय विक्री
- ‘शेतकरी आंदोलनात माझ्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
