Share

पूनम पांडे रुग्णालयात दाखल; पतीला पोलिसांकडून अटक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेने पतीवर मारहाणीचा आरोप केला होता, त्यानंतर पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी सॅम बॉम्बे याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रार नोंदवल्यानंतर पूनमला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

एका वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी सांगितले की, ‘सॅम बॉम्बेवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अभिनेत्रीच्या डोक्याला, डोळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. पूनम आणि सॅम यांच्यात झालेल्या भांडणाबद्दल फारशी माहिती नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

पूनम पांडेने सॅम बॉम्बेवर मारहाणीचा आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. पूनम आणि सॅमचे सप्टेंबर २०२० मध्ये लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी पूनमने सॅमवर शारीरिक छळ, धमक्या आणि मारहाणीचे आरोप केले. तिने गोव्यात तक्रार दाखल केली होती आणि सॅमने कथितपणे तिच्यावर हल्ला केला आणि धमकी दिल्याचे म्हटले होते. पूनम त्यावेळी गोव्यात शूटिंग करत होती. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली पण दुसऱ्याच दिवशी त्याला जामीन मिळाला होता. त्यावेळी पूनम मला वेगळे व्हायचे आहे असे म्हणाली होती. दरम्यान, पूनम आणि सॅमने १० सप्टेंबर २०२० रोजी लग्न केले होते. दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्यांना या लग्नाची माहिती दिली होती. लग्नापूर्वी सॅम आणि पूनम बराच काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!