Share

पवारांनाही समजू दे त्यांच्या मंत्र्यांनी काय दिवे लावलेत- देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांवर खळबळजनक आरोप केले आहेत. सन 1993 मध्ये मुंबईत जे बॉम्बस्फोट झाले, त्यामध्ये मुंबईकरांचे चिथडे उडाले. ज्यांनी या बॉम्बस्फोटासाठी रेकी केली आणि आर.डी.एक्स गाडीत भरले, त्या सरदार शहाव अली खान आणि मो. सलीम ईशाक पटेल उर्फ सलीम पटेल यांच्याशी अल्संख्यांक मंत्री नवाब मलिकांचे थेट संबंध आहेत. कुर्ल्यातील जमीन खरेदी-विक्री प्रकरणात तेव्हा मंत्री असताना मलिक गुंतलेले होते, असा बॉम्ब विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे फोडला आहे.

कुर्ल्यासारख्या अशा 5 संपत्तीसाठी मलिकांनी अंडरवर्ल्डच्या लोकांसोबत व्यवहार केले. ज्यांपैकी ४ संपत्तीमध्ये अडरवर्ल्डचा ॲंगल पक्का आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो. २००५ पर्यंतच्या या संपत्ती आहेत. हे पुरावे मी देणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हे पुरावे पाठवणार आहे. जेणेकरून त्यांनाही माहिती व्हावे, की त्यांच्या मंत्र्यांनी काय काय दिवे लावले आहेत.

मायमराठीची क्षमा मागून आजची पत्रकार परिषद मातृभाषेऐवजी राष्ट्रीय भाषेतून फडणवीसांनी सुरू केली. ते म्हणाले, एक घोषणा केली होती, दिवाळीनंतर तुमच्यासमोर काही विषय आणणार. थोडा वेळ लागला पण आज मलिकांच्या विरोधातील पुरावेच मी देणार आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!