मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा वाद शिगेला पोहचला आहे. एकमेकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांवर खळबळजनक आरोप केला आहे. त्यांची पत्रकार परिषद होते तोच नवाब मलिकांनीही पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की, दिवाळीनंतर ते राजकीय फटाके फोडणार आहेत. पण आम्हाला वाटतं की त्यांचे फटाके भिजले आणि वाजलेच नाहीत. फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिकांचा बॉम्बस्फोटाच्या लोकांशी संबंध असल्याचा माहोल तयार केला. पण त्यांना माहिती देणारे कच्चे खेळाडू आहेत, अशा शब्दांत नवाब मलिक यांनी फडणवीसांवर पलटवार केला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी थेट अंडरवर्ल्डशी नवाब मलिक यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले आहेत. नवाब मलिक यांनी 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ये तो हसीना का नवाब निकला….; फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपची टीका
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
- ‘आ रहा हूँ मैं’, मलिकांचा फडणवीसांना सूचक इशारा
- ‘विमा कंपनी व नेत्यांचा शेतकऱ्यांवर दरोडा’, राजू शेट्टी कडाडले
- राज्य सरकारविरोधात भाजपचं पुण्यात आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

