मुंबई : मागील काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. तसेच मलिकांनी एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले.याच पार्श्वभूमीवर आज(९ नोव्हें.)पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट अंडरवर्ल्डशी नवाब मलिक यांचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे यासंदर्भात फडणवीसांनी कागदोपत्री पुरावे देखील सादर केले आहेत.
यावेळी फडणवीस म्हणाले की,’नवाब मलिक यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही साडेतीन कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली,’ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, सलीम पटेल हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा ड्रायव्हर, फ्रंट मॅन आहे, तो देखील या जमिनीचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर, असेही ते म्हणाले.
दरम्यान, अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या किमान ५ व्यवहारांची माहिती आपल्याकडे असून त्याची कागदपत्र संबंधित तपास यंत्रणांना आपण देणार असल्याचेही यावेळी फडणवीसांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही वारी सरकारच्या ‘सब का साथ, सब का विकास या…’, पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
- मानहानीच्या याचिकेनंतर नवाब मलिक यांच्या विरोधात वानखेडेंच्या वडिलांची अजून एक तक्रार
- ‘…हा तर फुसका बॉम्ब’, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीवरून शिवसेनेचा हल्लाबोल
- ‘जे धोतरात कमावले ते लुगड्यात गमावले’, राऊतांचे टीकास्त्र
- भोपाळमधील कमला नेहरु रुग्णालयाच्या चिल्ड्रन्स वॉर्डला भीषण आग; चार बालकांचा मृत्यू

