🕒 1 min read
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा वाद शिगेला पोहचला आहे. एकमेकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आज देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मलिकांवर खळबळजनक आरोप केला आहे. त्यांची पत्रकार परिषद होते तोच नवाब मलिकांनीही पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर फटाके फोडणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, फटाके फुटले नाहीत आवाज झाला नाही, असं नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक यांचा बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबध असल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला गेला. देवेंद्र फडणवीस तुम्ही 1999 ला या शहरात आलात. यापूर्वी गोपीनाथ मुंडे नेते होते. त्यांनी देखील अशाचं प्रकारचे अनेक आरोप केले होते. गेल्या 62 वर्षांच्या जीवनात किंवा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर 26 वर्षांच्या काळात कोणी आरोप करु शकलं नाही. मात्र, तुम्ही माझ्यावर कवडीमोल दरानं जागा खरेदी केल्याचा आरोप केला. तुम्हाला माहिती देणारे व्यक्ती कच्चे खेळाडू असल्याचा पलटवार नवाब मलिक यांनी केला. मीच तुम्हाला कागदपत्रं दिली असती, असं नवाब मलिक म्हणाले.
तुम्ही अंडरवर्ल्डचा खेळ सुरु केला आहे. मी आज बोलणार नाही. उद्या देवेंद्र फडणवीस यांचा अंडरवर्ल्डचा काय खेळ महाराष्ट्रात आहे? देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना शहरात होस्टेज बनवलं होतं? याचा उद्या 10 वाजता भांडाफोड करणार आहे, असा इशारा नवाब मलिकांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांना आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू- नवाब मलिक
- ये तो हसीना का नवाब निकला….; फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपची टीका
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
- ‘आ रहा हूँ मैं’, मलिकांचा फडणवीसांना सूचक इशारा
- ‘विमा कंपनी व नेत्यांचा शेतकऱ्यांवर दरोडा’, राजू शेट्टी कडाडले

