पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांवर खळबळजनक आरोप केला आहे. ‘नवाब मलिकांच्या कुटुंबियांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आली’, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपानंतर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मलिकांवर टीका केली आहे.
ये तो हसीना का नवाब निकला….हसीना पारकर सोबत नवाब मलिकचे संबंध, अंडरवर्डची जमीन यांनी कवडीमोल भावाने विकत घेतली. माफिया, दशहतवादी, राष्ट्र विरोधी शक्तींशी संबंध असणाऱ्या नवाब मलिकने मंत्रिपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी जगदीश मुळीक यांनी केली आहे.
ये तो हसीना का नवाब निकला….
हसीना पारकर सोबत नवाब मलिक चे संबंध, अंडरवर्ड ची जमीन यांनी कवडीमोल भावाने विकत घेतली.
माफिया, दशहतवादी, राष्ट्र विरोधी शक्तींशी संबंध असणाऱ्या नवाब मलिकने मंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. pic.twitter.com/g6f2wSSyVj
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) November 9, 2021
सलीम पटेल हे व्यक्ती आहेत. आर.आर.पाटील एका इफ्तार पार्टीत गेले होते. त्यामध्ये आर.आर. पाटील यांचा दोष नव्हता. सलीम पटेल याच्यासोबत फोटो चालवला गेला होता. सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता. 2007 मध्ये हसीना पारकरला अटक झाल्यानंतर सलीम पटेलला अटक करण्यात आली होती. दाऊद फरार झाल्यानंतर हसीना पारकरच्या नावावर संपत्ती जमा करण्यात येत होती. सलीम पटेलच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी करण्यात येत होती, असा दावा फडणवीस यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
- ‘आ रहा हूँ मैं’, मलिकांचा फडणवीसांना सूचक इशारा
- ‘विमा कंपनी व नेत्यांचा शेतकऱ्यांवर दरोडा’, राजू शेट्टी कडाडले
- राज्य सरकारविरोधात भाजपचं पुण्यात आंदोलन
- ‘टाईम पास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बॉसमध्ये जावं’


