मुंबई: देशभरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र शिवजयंती (Shiv Jayanti) साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्त चेंबूर टिळक नगर मध्ये उत्तर मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन ह्या शिवजयंती कार्यक्रमात आल्या होत्या.
यावेळी बोलताना पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे. पूनम महाजन म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन काही राजकीय पक्ष काम करत आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालवत आहे, असं पूनम महाजन यावेळी म्हणाल्या.
तसेच पुढे बोलताना पूनम महाजन यांनी शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधत म्हणल्या, शिवरायांच नाव घेऊन शिवसेना राजकारण करत आहे, असं म्हणत भाजप खासदार पूनम महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. सध्या राज्यात भाजप (BJP) आणि शिवसेना यांच्यात चांगलेच राजकारण तापलेले बघायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
“मराठी भाषा गौरव दिन जेवढा भव्य करता, तेवढा करा”, मनसेचे आवाहन
रशियात युद्धजन्य परिस्थिती; जयंत पाटलांनी केली पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ मागणी
शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात नाना पाटेकरांनी सुनावले खडेबोल; म्हणाले, ‘निवडून देतो म्हणजे…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

