गेवराई – कोरोना काळात आर्थिक गणिते बिघडली असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. यातच महावितरणने भरमसाठ बिले पाठवल्याने गोरगरिबांची अवस्था बिकट बनली आहे. वीज बिलांबाबत सरकारने शेतकऱ्यांचा छळ सुरू केला आहे असा आरोप केला जात आहेत.
लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने ३०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. परंतु ऊर्जामंत्र्यांनी केलेली ही घोषणा केराच्या टोपलीत गेली आहे. आता वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.
जग लॉक डाऊन झालेलं असताना बळीराजाने अश्या परिस्थितीतही जीवाची पर्वा न करता शेतातलं पीक पोसून सर्वांचं पोट भरायचं काम केलं.त्यावेळी ही संचारबंदी असल्याने हा शेतमाल विकायचा कसा..? असा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना कवडी किमतीत माल विक्री केला तर काही शेतकऱ्यांवर माल बांधावर फेकण्याची वेळ आली.
मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला त्यामुळे या वर्षी पिकं चांगली जोमात होती. परंतु वीज तोडणी मुळे नद्या,नाले, विहिरीला पाणी असताना ही पीक पाण्याअभावी जळून खाक होत आहे.पाण्या विना जनावरांचे हाल होत आहेत.त्यात मार्च एन्ड असल्याने बँकेने तगादे लावले आहेत.अश्या परिस्थितीत शेतकऱ्याने जगायचे कसे..?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई ची वीज जर 10 मिनिट साठी बंद झाली तर मंत्री MSEB च्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसतात आणि लाईन क्षणात सुरळीत होते.परंतु आज महिन्याभरापासून शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट होऊन शेतकऱ्यांच्या जीवावर मुंबईत बसलेल्या मंत्र्या-संत्र्यांना जाग का येत नाही..??.मग सरकारचा जीव फक्त मुंबईत असेल आणि मुंबई ची लाईन बंद झाल्यावरच जर सगळे लोकप्रतिनिधी जागे होणार असतील तर सरकारला आमचा इशारा आहे,ही मुंबईला जाणारी लाईन काही पोस्टाने जात नाही ती खांबा खांबाने शेतकऱ्यांच्या वावरातूनच मुंबईला जाते.ती तोडण्याशिवाय आता शेतकऱ्यांना पर्याय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या पूजा मोरे यांनी दिला आहे.
शेतकऱ्याच्या वावरातून ही लाईन जात असताना मुंबई उजेडात आणि मुंबईच पोट भरणारा शेतकरी जर अंधारात राहणार असेन तर आता ”आम्ही अंधारात तर मुंबईही अंधारात” हीच भूमिका शेतकरी घेतील आणि शेतातून मुंबई कडे जाणारी लाईन तोडतील असं मोरे यांनी ठणकावून सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दीपाली चव्हाण प्रकरणात रेड्डीला अटक का केली नाही ? फक्त थातुरमातुर बदलीचे नाटक का ?
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- फुकटात मंत्रिपद मिळालंय, म्हणून आव्हाडांची वळवळ सुरु आहे – राणे
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

