पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरुन पूजा ने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून तिने जीव दिला असल्याचा आरोप भाजप नेते करत होते. त्याचबरोबर पोलिसही हे प्रकरण दबावामुळे गांभीर्याने घेत नसून पूजाच्या जप्त केलेल्या मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये अनेक धक्कादायक बाबी असल्याचेही भाजप नेत्यांचे म्हणणे होते.
परंतु आता या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पूजाने जीव दिला नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी दिल्याची माहिती मिळत आहे. इतकच नाही तर रुममध्ये वाईनच्या बाटल्याही सापडल्याची माहिती मिळत आहे. वानवडी पोलिसांनी अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे. या जबाबानुसार आता पूजा चव्हाण प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूजा चव्हाणच्या आई-वडिलांचा जबाबत पोलिसांनी यापूर्वीच नोंदवला आहे. या घटनेचा उलगडा होण्यापर्यंत तपास सुरु राहणार आहे. पोलीस महासंचालकांनी पुणे पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिल्याची माहिती मिळतेय. पण पोलीस मात्र याबाबत अधिकृतपणे बोलत नाहीत. दरम्यान आज उशिरापर्यंत पोलीस महासंचालकांना चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
- लांबोटा ग्रामपंचायतीत भाजप-काँग्रेसची युती ; दोन युवतीनी घडवला इतिहास
- संजय राठोड हे विदर्भातील शिवसेनेचे आधारस्तंभ – संजय राऊत
- विरोधकांनी समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरु, बंजारा समाज आक्रमक !
- उद्यापासून महाविद्यालये सुरु ; पुण्यात अभाविप करणार ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत
- असे असेल औरंगाबादचे सफारी पार्क!


