Share

लांबोटा ग्रामपंचायतीत भाजप-काँग्रेसची युती ; दोन युवतीनी घडवला इतिहास

Published On: 

लातूर : निलंगा तालुक्यात नुकत्याच झालेल्या लांबोटा येथील ग्रामपंचायतीवर भाजप-काँग्रेस ने युती करत सरपंच, उपसरंपच पदावर आपले नाव कोरले. या ग्रामपंचायतीवर दोन युवतींनी आपले वर्चस्व स्थापन केले आणि इतिहास घडवला आहे. या इतिहासाने तालुक्यात वेगळाच दबदबा निर्माण केला आहे. अवघ्या २१ व २४ वर्षाच्या तरुणीने गावचे सरपंच, उपसरपंच पद मिळवले.

निलंगा तालुक्यात लांबोटा येथे भाजपचे दोन गट तर काँग्रेसचा एक गट पडल्याने तिरंगी लढत झाली. निवडणुकीत कोणालाही बहुमत मिळाले नसल्याने शेवटी भाजप व काँग्रेसची युती झाली. सरपंच काँग्रेस पक्षाचा तर उपसरपंच भाजपचा अशी युती झाली. यामुळे बंडखोर पॅनल ला घरचा रस्ता मिळाला. सरपंच म्हणून २१ वर्षाची डी फार्मसीची विद्यार्थीनी ज्योती भागवत सारगे तर उपसरपंच बारावी पास २४ वर्षाची ज्योती दत्ता गडीमे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे लांबोटा ग्रामपंचायत निवड चांगलीच चर्चेत आली आहे.

अवघ्या २१ व २४ वर्षाच्या तरुणीने गावचे सरपंच,उपसरपंचपद भुषवल्यामुळे या सावित्रीच्या लेकीचा इतिहास निर्माण झाला आहे. या दोन्ही युवतींचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर यावेळी ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्ञानेश्वर किसन गड्डीमे, सुलभा काशिनाथ गोपाळे, वसंत रामचंद्र मोरे, अलका दिलीप बिरादार ,कविता त्र्यंबक तुरे यांची निवड झाली आहे. त्यावेळी व्यंकट पाटील, बालाजी मुगळे, नागोराव ढगे, ज्ञानोबा पाटील, विजयकुमार हंगरगे, माजी सरपंच कृष्णा गोबाडे, अमोल मोरे, बालाजी पाटील, यांनी या सरपंच लेकींना शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!