Share

विरोधकांनी समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरु, बंजारा समाज आक्रमक !

Published On: 

🕒 1 min read

वाशिम : बीड जिल्ह्यातील परळीतील पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही कथित ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाल्या  आहेत. पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पहाता याचा थेट शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. त्यामुळे पोलिसांनी स्यु-मोटोतंर्गत तक्रार दाखल करत संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी भाजपने केली आहे.तर दुसरीकडे संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाज आक्रमक झालेला आहे.

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणाऱ्या पोहरादेवी संस्थानच्या महंतांची आज बैठक पार पडली आहे. यावेळी पूजा चव्हाण संशयित मृत्यू प्रकरणात विरोधकांच्या निशाण्यावर आलेले संजय राठोड यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. विरोधकांनी समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. वाशिममधील पोहरादेवी संस्थान येथे आज दुपारी १२ वाजता महत्त्वाची बैठक पार पडली आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू स्वर्गीय रामराव महाराज यांचे धर्मपिठाधिश्वर बाबूसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.

एकीकडे पोहरादेवी संस्थानच्या महंतांची आज बैठक पार पडली तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे आज बंजारा समाजाच्या वतीने संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. ‘संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, कुठेतरी समाजाची बदनामी केली जात आहे. त्यामुळे बदनामी करण्याचा कट केला जात आहे’, असे मत बंजारा समनव्य समितीने व्यक्त केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!