Share

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरू केलेले राजकारण बंद करावे – नवाब मलिक

Published On: 

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कुठेही औषधे किंवा रेमडेसिवीर इंजेक्शन्सचे वाटप करण्यात आलेले नाहीय मात्र असे असताना भाजपाने राजकारण करुन बदनामी सुरू केलीय. त्यामुळे हे राजकारण बंद करावे असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला आहे.

भाजपाच्या गुजरात रेमडेसिवीर साठा-वितरणावर टीका झाल्यावर भाजपाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या मदतीकडे बोट दाखवले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रुग्णांना वैयक्तिक मदत न करता जिल्हा प्रशासन व पालिकांच्या यंत्रणांना वितरण केले आहे. पक्ष व्यासपीठांवर मदत दिलेली नाही असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे .

गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत असल्याचे नुकतेच समोर आले होते. त्यातून नैराश्य आलेल्या भाजपकडून आता राज्यात राष्ट्रवादीच्या विरोधात अशाप्रकारचे राजकारण सुरू करण्यात येत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!