बीड: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून करुणा आणि रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत.ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते आहेत सोबतच सामाजिक न्याय विभागाचे मंत्रिपद देखील ते सांभाळत आहेत त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे पडसाद राज्यभर पाहायला मिळाले.
दरम्यान, नुकतच धनंजय मुंडे यांच्या जन्मगावी विविध विकास कामांचे उद्घाटन व नागरी सत्कार सोहळ्याला पार पडला. यावेळी बोलताना मुंढे भावूक झाले. करुणा शर्मा प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाष्य केले. ‘जो व्यक्ती 1 हजार लोकांसमोर बोलला लाख माणसाच्या सभेत बोलला त्या व्यक्तीला काय बोलावे प्रश्न पडवा, तशी माझी अवस्था झाली आहे. आज माझ्या जन्मगावात बोलतोय. राज्यातील राजकीय जीवनातील भाषणाचे मुल्यमापन गावातील भाषणात करू नये’ अशी विनंती ही मुंडेंनी पत्रकारांना केली.
‘माझ्या गावात बोलताना सुरुवात कोठून करावी. आसराच्या डोहात पोहणे, सातभाईच्या बावडीत पोहायला शिकलो, वाण नदीत, पहाटेपर्यंत बत्तीच्या उजेडात मासे धरावीत, जुन्या आठवणी ना उजाळा देत गावात फिरताना अनेक सहकारी होते, गावातील परिस्थिती पहिली आताची पिढी बाहेर गावी राहत आहेत. मात्र, मी माझ्या आयुष्याचा शेवट नाथरा गावात घालेल, गावाचं आणि स्व.पंडित अण्णाचे नातं होतं. सर्वात जास्त नाथऱ्यात करमायचं, आमच्या शिक्षणासाठी परळीत घर केलं पण अण्णा रोज चार तास गावात यायचे लहानाचा मोठा तुमच्या देखत झालं. स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं यासाठी आम्ही काम करणारी माणसे कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं इथपर्यंत पोहोचलो,’ अशी भावनाही मुंडेंनी व्यक्त केली.
‘माझ्याकडून तुमच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मी मुंडे साहेबांसारखं काम करावं, असं वाटतं, काहींना वाटत मी अण्णा सारखं वागावं. मात्र, मी एवढा मोठा नाहीये या गावाने मागितलं काहीच नाही. गावातील पुत्र मोठे झाले.. पण विकासाची अपेक्षा ठेवली नाही. हा मोठेपणा नाथराचे आहे. सगळे राजकीय वैभव नाथऱ्यांनी पाहिले मात्र गावाला शोभेल असा विकास पाह्यलं मिळाला नाही. पण आत्ता फुल नाही फुलाची पाकळी तरी विकास करत आहे,’ असंही धनंजय मुंडे म्हणाले.
‘स्व. अण्णांनी कठीण प्रसंगात गावाला जीव लावला, तसं गावाने आम्ही संकटात असताना सांभाळले. त्याचे उपकर फिटू शकणार नाहीत. तुम्ही कल्पना करु शकणार नाही एवढा विकास येत्या चार वर्षांत करेल. पिढ्यान पिढ्या या गावातील परिसरातील लोकांना अडचण येणार नाही, असा विकासच स्वप्न मी पाहिलं. माझ्या मातीतील प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न दुप्पट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.’ असा शब्द धनंजय मुंडेंनी यावेळी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटने केली पुरस्कारांची घोषणा ; स्टीव स्मिथला ‘हा’ मानाचा पुरस्कार जाहीर
- ….त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे: पोलीस कर्मचाऱ्याचा व्हॉट्सअॅपवर मॅसेज
- फॉर्मात असलेला जो रूटची आयपीलमधून माघार ‘हे’ आहे कारण
- ‘वाटत होत मी मंत्री झाल्यावर संकट थांबतील, पण… धनंजय मुंढे झाले भावुक !
- “सामन्यासाठी समालोचकांची गरज नाही, एकटा रिषभ पंत पुरेसा”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
