🕒 1 min read
बीड: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून करुणा आणि रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत.ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते आहेत सोबतच सामाजिक न्याय विभागाचे मंत्रिपद देखील ते सांभाळत आहेत त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे पडसाद राज्यभर पाहायला मिळाले.
दरम्यान, नुकतच धनंजय मुंढे यांच्या जन्मगावी विविध विकास कामांचे उद्घाटन व नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुंढे भावूक झाले. ‘मी मंत्री झाल्यावर संकट थांबतील असं वाटत होतं. मात्र, राजकारणात मैदानात हरवता ऐणे शक्य नाही त्या वेळेस माझ्या सोबत झालं, ते होत जोपर्यंत मायबाप जनतेच्या मनात विश्वास आहे म्हणून कुणी कितीही काही केलं तरी तुमच्या आशीर्वादाने काहीच होणार नाही. अपेक्षा खूप मोठ्या आहेत. त्यापेक्षा जास्त विकास करून विश्वासला पात्र होईल. सुख दुःखात मी आहे. द्वेषाचं, छळ, कपट राजकारण करत नाही. फार संघर्षातून इथंपर्यंत आलोय त्यासाठी तुमचे आशीर्वाद कामी आले ते असेच कायम ठेवा राज्यात नाही तर देशात गावाचं नाव घेऊन जाईन. जगात केलेल्या सत्कारापेक्षा गावातील कौतुक जास्त आहे, उतरणार नाही मातणार नाही दिलेला शब्द खाली पडू देणार नाही, अशा शब्दांत धनंजय मुंडेंने आभार मानले.’
‘अनेक कठीण काळातून मी गेलो आहे. असा संघर्ष माझ्या नशिबी का आला, भगवंताला हात जोडून आभार मानतो. तू संकटं आणली म्हणून मी इथपर्यंत आलो. इमानदारीने काम केलं. आता लोक प्रेमाने भाऊ बोलता, अगोदर धन्या शिवाय बोलत नव्हते. नालायक नाही तर लायक होतो म्हणून आज हा सत्कार करत आहात माझा पुनर्जमावर विश्वास नाही. तरी होत असेल तर पुनर्जन्म द्यायचा असेल तर नाथऱ्याच्या मातीत दे’ अशी मागणीच धनंजय मुंडे यांनी ग्रामदैवत मारुतीच्या चरणी मागितलं. या भावूक भाषणाने यावेळी मुंढे यांनी जनतेला आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवसेना जोमात अन भाजप कोमात’ ; भाजपचा ‘या’ बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
- राज्य शासनाचे अनुदान बंद, औद्योगिक वीज ग्राहकांना बसणार बिलवाढीचा शॉक
- ‘खतविक्रीची नोंद ई-पॉसवर वेळेत करून घ्या’, कृषी अधिकाऱ्यांचे विक्रेत्यांना निर्देश
- शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं : राज ठाकरे
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटने केली पुरस्कारांची घोषणा ; स्टीव स्मिथला ‘हा’ मानाचा पुरस्कार जाहीर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
