Share

फॉर्मात असलेला जो रूटची आयपीलमधून माघार ‘हे’ आहे कारण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

तर काही दिवसांपूर्वीच सर्व संघांनी आपल्या रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी देखील जाहीर केली. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, आरोन फिंच सारख्या खेळाडूंना संघांनी सोडलेले असल्याने आगामी आयपीएल लीलावाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या विदेशी खेळाडूंसोबतच केदार जाधव, हरभजन सिंग, उमेश यादव सारखे अनेक भारतीय स्टार्स देखील या लिलावात सहभागी आहेत. मात्र याच वेळी एक महत्वाची बातमी समोर असून, इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटने आयपीएल लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएल लिलावासाठी 1097 खेळाडूंनी केलेल्या अर्जामध्ये रूटचे नाव नसल्याने अनेकांची निराशा झाली. रूट सोबतच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने देखील लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. रूटने मागील काही वर्षात आयपीएल लिलावामध्ये सहभाग घेतला होता, मात्र त्याला कुठल्याही संघाने खरेदी केले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये शानदार फॉर्म मध्ये असलेल्या रुटवर यावेळी लिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता होती, मात्र रुटने लीलावामध्ये सहभागी न होण्याचा मोठा निर्णय घेतला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!