Share

ऑस्ट्रेलियन क्रिकेटने केली पुरस्कारांची घोषणा ; स्टीव स्मिथला ‘हा’ मानाचा पुरस्कार जाहीर

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : ब्रिस्बेन कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. 328 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने सात विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताच्या या मालिका विजयानंतर संपूर्ण क्रिकेट विश्वाकडून संघाचे कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघावर टीकेची झोड उठवली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या या पराभवाला कर्णधार टीम पेनच्या खराब रणानितीला जबाबदार धरले जात आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने नुकत्याच वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा असलेला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा अॅलन बॉर्डर पुरस्कार स्टीव स्मिथला जाहीर केला आहे. स्मिथ सोबत या पुरस्काराच्या शर्यतीत वेगवान गोलंदाज पॅट कमिंस व मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा कर्णधार अॅरोन फिंच देखील होते. मात्र स्मिथने यात बाजी मारली. स्मिथला एकूण 126 मते मिळाली, तर कमिंसला 114 व फिंचला 97 मते मिळाली.

मानाचा अॅलन बॉर्डर पुरस्कार मिळाल्यानंतर स्मिथने आनंदा सोबतच थोडे आश्चर्य देखील व्यक्त केले. स्मिथ म्हणाला ,"मी थोडा आश्चर्यचकित झालो होतो. मला नाही वाटत मी एकदम शानदार कामगिरी केली. मला वाटलं होत की कमिंस अथवा मार्नस लबुशानेला हा पुरस्कार मिळेल. निश्चितच पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला. यामागे अथक परिश्रम लपलेले आहे." स्मिथने तिसऱ्यांदा अॅलन बॉर्डर पुरस्कार मिळवलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!