औरंगाबाद : समाजात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर असते. कर्तव्य बजावत असतना त्यांना कुटूंबाला पुरेसा वेळ देता येत नाही वगैरे अनेक कारणासाठी त्यांचे नेहमीच कौतुक होत असते. पण शेवटी तोही एक माणुसच त्यालाही भावना असतात, मान-अपमान असतो. अशाच एका घटनेत वरिष्ठ पोलीस रागवल्यानंतर अपमान वाटल्याने औरंगाबाद येथील एक पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्येची धमकी देऊन बेपत्ता झाले.
सदर कर्मचारी मुकुंदवाडी ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. शनिवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर हजर झाले. सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दहा वाजता वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी त्यांना बोलावून घेतले. हजेरी लावण्याच्या कामावरून त्यांच्यात सर्व कर्मचाऱ्यांसमोर वाद सुरू झाला. या वादातून त्यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी त्या कर्मचाऱ्यास रागावले. रागावल्यानंतर अपमान वाटल्याने कर्मचाऱ्याने तत्काळ ठाणे सोडले. त्यानंतर ठाण्यात नियमित कामकाज सुरू होते. काही वेळाने दुपारी त्या कर्मचाऱ्याने ठाण्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आत्महत्या करत असल्याचा संदेश पाठवला आणि त्यानंतर ते बेपत्ता झाले.
“मा. सर, आज सकाळी जो माझा अभद्र भाषेत अपमान झाला त्यामुळे मला खूप त्रास होत आहे. मनाला खूप वेदना होत आहेत. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवत आहे.’अशा आशयाचा संदेश मुकुंदवाडी ठाण्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर या कर्मचाऱ्याने टाकला. त्यानंतर तत्काळ त्यांना कॉल केले असता कर्मचाऱ्याने मोबाइल स्विच ऑफ केला. संदेश वाचून धास्तावलेल्या निरीक्षकांनी त्याच्या शोधासाठी कर्मचाऱ्यांना कामाला लावले. रात्री उशीरा त्या कर्मचाऱ्याचा शोध लागला असल्याची माहिती मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियन क्रिकेटने केली पुरस्कारांची घोषणा ; स्टीव स्मिथला ‘हा’ मानाचा पुरस्कार जाहीर
- ‘जयहिंद बोलणारे हजारो देशद्रोही, गाझीपूरच्या धगधगत्या युद्धभूमीवर’
- हॉटेलवर परताच ‘रुट’ चेन्नईकरांच्या स्वागताने भारावला ; पाहा सुंदर व्हिडिओ
- आम आदमी पक्षाची आता गुजरातमध्ये मोर्चे बांधणी सुरू
- कामधेनू आयोगाच्या अध्यक्षांची कृषी विद्यापीठाच्या पशुशक्ती प्रकल्पाला भेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

