Share

“सामन्यासाठी समालोचकांची गरज नाही, एकटा रिषभ पंत पुरेसा”

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघातकडे सर्वांचे लक्ष आहे. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा आपल्या मजेशीर स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर काही वेळा संघसहकार्‍यांसोबत त्याचे चाललेले विनोदी संभाषण तर कधी विरुद्ध खेळाडूंसोबत चाललेली स्लेजिंग सोशल मीडियावर कायमच वायरल होत असते.

इंग्लंड विरुद्धच्या चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी देखील पंतचे एक नवे रूप बघायला मिळाले. यावेळी पंत तालासुरात एक वाक्य बोलताना दिसला. सामन्याच्या पहिल्या दिवशी जो रुट व डॉम सीबली फलंदाजी करत असताना भारताचा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर त्यांना गोलंदाजी करत होता. यावेळी पंत काही मजेशीर कॉमेंट्स करत होता. स्टम्प माइक मध्ये आलेल्या आवाजानुसार पंत म्हणाल ,”मेरा नाम है वॉशिंग्टन मुझे जाना है डीसी.” पंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, क्रिकेट फॅन्स देखील त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.

पंतच्या या संभाषणाबाबत भारताचे माजी क्रिकेट खेळाडू विनोद कांबळी यांनी ट्विटरवर एक मजेशीर सल्ला दिला आहे. विनोद कांबळी यांनी ट्विटरवर लिहिले,’या सामन्यासाठी समालोचकांची गरजच नाही. रिषभ पंतचे संभाषण पुरेसे आहे.’ कांबळी यांच्या या मजेशीर ट्विटर चाहत्यांनी देखील सहमती दर्शवत वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कांबळी यांनी उल्लेख केल्याप्रमाणेच संपूर्ण सामन्यात पंत मजेशीर संभाषण करताना दिसला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!