🕒 1 min read
नवी-दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले. बिहारमध्ये जास्तीत जास्त करोना लसींचे डोस देण्यात आले असून को-विन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, रात्री ११:२० पर्यंत दोन कोटी ३७ लाख ७३ हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत देशभर दिल्या गेलेल्या एकूण लसींच्या डोसची संख्या ७९ कोटी १३ लाखांहून अधिक झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
लसीच्या या विक्रमानंतर मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोव्यातील आरोग्यसेवा कर्मचारी आणि कोविड लसीच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाच्या विक्रमावरून काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले की,’मी असे ऐकले आहे की लस घेतल्यानंतर १०० पैकी एका व्यक्तीला त्रास होतो. जास्त ताप आल्यानंतर मानसिक संतुलनही बिघडते. पण मला जाणून घ्यायचे आहे की, काल जेव्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडीच कोटींपेक्षा जास्त लोकांना लसीचे डोस दिले आहेत. त्यापैकी काहींना त्रास झाला हे मी ऐकले आहे. पण हे मी पहिल्यांदाच पाहात आहे की अडीच कोटी लोकांना लसींचे डोस दिल्यानंतर रात्री १२ वाजल्यानंतर एका राजकीय पक्षाला त्याचा त्रास सुरू झाला. त्यांचा ताप वाढला आहे. याचे काय लॉजिक?’ असेही मोदी म्हणाले.
दरम्यान, एका सामाजिक कार्यकर्त्याशी संवाद सोडतांना मोदी म्हणाले की,’जर देशाने आपला संकल्प सिद्ध करायचा असेल तर प्रत्येकाच्या प्रयत्नांना आमच्या प्रयत्नांमध्ये खूप महत्त्व आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे गोव्याने लसीकरणात यश मिळवले आहे. तुमच्यासारखे समाजसेवा करणारे लाखो लोक आहेत. मी तुमचे अभिनंदन करतो.’
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई : ‘सेरो सर्वेक्षणा’त ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये आढळून आल्या अॅण्टीबॉडीज्
- ‘भाजपात एकमेव मोदींचा चेहरा, बाकी सारे नाचरे मुखवटे’ शिवसेनेची टीका
- ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात, 23 सप्टेंबरला सुनावणी
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
