मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा कॉंग्रेसकडून राज्यभर निषेध केला जात आहे. आज कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर कॉंग्रेस आंदोलन छेडणार होते. मात्र नाना पटोले यांच्या घराच्या गेटसमोरच पोलिसांनी त्यांना अडवले आहे.
तर दुसरीकडे भाजपनेही रस्ता रोको आंदोलन करत कॉंग्रेसला विरोध केला आहे. दरम्यान नाना पटोले वारकऱ्यांसह सागर बंगल्यावर निघाले असताना पोलिसांनी त्यांना मध्येच अडवले आहे. त्यांना मलबार हिल परिसरात न जाण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे. तर दुसरीकडे भाजपही आता रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे पोलिसांपुढे कॉंग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष आमनेसामने येऊ नये असे मोठे आव्हान असणार आहे.
दरम्यान काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना ‘सागर’ बंगल्याजवळून पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजप नेते राम कदम यांनी स्वतःच अपयश झाकण्यासाठी कॉंग्रेसची नौटंकी असल्याची टीका केली आहे. दरम्यान बाबुलनाथ परिसरातून भाजप कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर बंगल्यावर कॉंग्रेस-भाजप आमनेसामने येऊ नये, यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- “काही दिवसांत भाजपचे साडे तीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील”, संजय राऊतांचा मोठा दावा
- IPL AUCTION 2022: मेगा ऑक्शननंतर अशी आहे रोहित शर्माची ‘पलटन’
- पाटलांच्या वक्तव्यावर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने बोलणे योग्य नाही- अजित पवार
- “महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते आई आणि मावशीचे पण मोदींनी..”, नाना पटोलेंचा टोला
- “हा जाती भेद नाही का?”, ‘त्या’ जाहिरातीवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

