🕒 1 min read
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप लावले आहेत. वाईन व्यवसाय, तसेच पुण्यातील जम्बो कोविड घोटाळा यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे निकटवर्तीय यांना निशाण्यावर धरले आहे. यालाच उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत उत्तर देणार असल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे.
दरम्यान आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोठा दावा केला आहे.(Sanjay Raut big claim) ते म्हणाले की, “जे लोक आम्हाला म्हणतात की, अनिल देशमुख यांच्या कोठडीत तुम्ही काही दिवसांत दिसणार. मात्र येत्या काही दिवसांत भाजपचेच साडे तीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत दिसतील, आणि अनिल देशमुख बाहेर असतील.’, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
“आम्ही खूप बर्दाश्त केले, आता बरबाद करू”
“महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे, आणि ते शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आहे. हे लक्षात ठेवा. आणि सरकार हे सरकार असते. पाहू कोणात किती दम आहे ते! ‘आम्ही खूप बर्दाश्त केले, आता बरबाद करू’, एजन्सी काय आहे, याची धमकी आम्हला नका देऊ, आम्ही घाबरणाऱ्यामधून नाहीये. लक्षात ठेवा”, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते आई आणि मावशीचे पण मोदींनी..”, नाना पटोलेंचा टोला
- “हा जाती भेद नाही का?”, ‘त्या’ जाहिरातीवरून जितेंद्र आव्हाड आक्रमक
- “तऱ्हेवाईक नाना पटोलेंनी सागर बंगल्या जवळ येऊन दाखवावे”, प्रसाद लाड यांचे आव्हान
- IPL AUCTION 2022: काही जुने तर काही नवे ‘whistle podu’ करण्यास धोनीची चेन्नई तय्यार
- “वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का?”, एकनाथ खडसेंचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
