Share

IPL AUCTION 2022: मेगा ऑक्शननंतर अशी आहे रोहित शर्माची ‘पलटन’

Published On: 

बंगळूरू: मुंबई इंडियन्सचा संघ प्रत्येक ऑक्शनमध्ये आपला संघ संपूर्ण विचार करत आणि रणनीती आखात तयार करत असतो. मुंबई इंडियन्सने गेल्या काही वर्षांमध्ये कोर ग्रुप राखून ठेवल्याने चांगली कामगिरी केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील MI ने स्पर्धेत वर्चस्व राखले आहे. तसेच पाच वेळा आयपीएलची ट्रॉफी सुद्धा जिंकलीआहे.मुंबईने रोहित शर्माला १६ कोटीत, जसप्रीत बुमराहला १२ कोटीत , सूर्यकुमार यादव ८ कोटी, आणि किरॉन पोलार्ड ६ कोटींमध्ये रिटेन केले होते.

मुंबईने इतिहासात पहिल्यांदाच ईशान किशनसाठी १० कोटीहून जास्त खर्च केला आहे. ईशान किशनला खरेदी करण्यासाठी अनेक संघ बोली लावत होते. २ कोटी बेस प्राईस असलेल्या ईशानवर मोठी बोली लागली.मात्र मुंबईने त्यांच्या संघातील स्टार खेळाडूला संघात परत आणण्यास सर्वस्व लावले. मुंबईने ऑक्शनच्या पहिल्या दिवशी केवळ ईशानसाठी मोठी बोली लावली. त्यांनी कोणत्याही इतर खेळाडूंमध्ये इंटरेस्ट दाखवला नाही. त्याची हि रणनीती दुसऱ्या दिवशी उलगडली. मुंबईने जोफ्रा आर्चरसाठी पर्स वाचवून ठेवला होता. जोफ्रा यंदाचा सीजन खेळणारा नसतानाही त्यांनी आपली गोलंदाजी मजबूत करण्यासाठी बुमराहच्या जोडीला जोफ्राला ८ कोटीत खरेदी केले.

आयपीएल मेगा ऑक्शननंतर मुंबईची पलटन अशी आहे. रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, इशान किशन, देवाल्ड ब्रेविस, बेसिल थंपी, एम अश्विन, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, एन टिळक वर्मा, संजय यादव, जोफ्रा आर्चर, डॅनियल सॅम्स, टिम डेव्हिड, रिले, टायमल मिल्स. मेरेडिथ, मोहम्मद अर्शद खान, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, हृतिक शोकीन, अर्जुन तेंडुलकर, फॅबियन अॅलन, आर्यन जुयाल.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!