मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडवा मेळाव्यात मदरसे आणि मशिदीमध्ये समाज विघातक गोष्टी घडत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधान आले आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच आता वंचितने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येते.
राज ठाकरे यांच्या विधानात तथ्य असेल तर महाराष्ट्र पोलिसांनी मशिदी सील कराव्यात, पण जर राज ठाकरेंच्या विधानात तथ्य आढळून आले नाही तर त्यांना पोलिसांनी बेड्या ठोकाव्यात, अशी भूमिका वंचितने घेतली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर (Rekha Thakur) यांच्या नावाने प्रसिद्धीपत्रक काढून वंचितने सदरील मागणी केली आहे.
तसेच राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात मशिदीवरचे अनधिकृत भोंगे हटवण्याची मागणी करत जर भोंगे हटवले नाहीत, तर मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा लावण्याची कार्यकर्त्यांना सूचना केली. यावरच प्रकाश अमाबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी विरोध करत अगोदर अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावा. आमचा एकही बहुजन पोरगा नकोय तिकडे असे म्हणत टीका केली.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी आणि आयकर खात्याला धाडी टाकायला सांगण्यापेक्षा एकदा मुंबईच्या झोपडपट्ट्यांमधील मदरशांवर धाडी टाकाव्यात. त्याठिकाणी तुमच्या हाताला ज्या गोष्टी लागतील ते पाहून तुम्हाला सर्व परिस्थिती लक्षात येईल, आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. पाकिस्तान हवाय कशाला? उद्या काही घडलं तर आतलीच परिस्थिती आवरताना नाकीनऊ येतील, इतक्या गोष्टी आतमध्ये भरल्या आहेत. असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
“मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही…”, राज ठाकरेंच्या टीकेवर अबू आझमींचे प्रत्युत्तर
IPL 2022 : प्लेऑफ आणि फायनलबाबत मोठं अपडेट; ‘या’ ठिकाणी रंगणार शेवटचे चार सामने?
IPL 2022: हैदराबादवर शानदार विजयानंतरही राहुल मात्र नाराज; ‘या’ खेळाडूंना फटकारले
गणपती, नवरात्री, विवाह समारंभात…”, राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अबू आझमींची पहिली प्रतिक्रिया
“भाजप केवळ समानतेच्या गप्पा मारत नाही तर…” ; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

