🕒 1 min read
मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील मदरशांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) केली. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे वारे वाहू लागले आहे. असे असतांनाच आता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी याविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अबू आझमी म्हणाले की,‘मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषणाची तक्रार असेल, तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का? मात्र, आम्ही कधी यासंदर्भात तक्रार केली नाही.’ तसेच फक्त निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर किंवा भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही आझमी म्हणाले.
दरम्यान, ‘ज्याप्रमाणे ईडी भ्रष्टाचाऱ्यांवर धाडी टाकत आहे, त्याप्रमाणे राज्यभरात झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाकायला हव्या.’ तसेच तिथ काय होत असतं हे पोलिसांना देखील माहित आहे. त्यामुळे मशिदींवर कारवाई करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावे. भविष्यामध्ये कोणती घटना घडेल यासाठी तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही. या झोपडपट्टीत इतक्या गोष्टी हाती लागतील, ज्या निस्तरताना तुमच्या नाकी नऊ येईल’, असे राज ठाकरे २ एप्रिल रोजी पार पडलेल्या जाहीर सभेत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 दरम्यान चेतेश्वर पुजाराला बसला ‘मोठा’ धक्का; रशिया-युक्रेन युद्धामुळं त्याच्यासोबत झाला ‘असा’ प्रकार!
- बाळासाहेबांनी मराठी भाषा व अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेना काढली- संजय राऊत
- “आधी लगीन रिफायनरीचे नंतर संपर्काचे”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- IPL 2022: ‘पॉवर हिटिंगची क्षमता असूनही…’ बॅक टू बॅक दुसऱ्या पराभवानंतर कॅप्टन केन संतापला!
- “महाराष्ट्र पेटवू नका”, जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंना विनंती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
